Maratha Matrimonial Portal for Marathi People in India and Maharshtra


आम्हा बद्दल...

Hema Taiमी सौ. हेमा भोसले,
www.marathavivah.com मध्ये आपले सहर्ष स्वागत करते. माझ्याबद्दल सांगायचे झाल्यास मी मुळची खानदेशातली (धुळ्याची) पद्मश्री कर्मवीर डॉ. दादासाहेब घोगरे यांची नात व न्यायाधीश शिवाजीराव घोगरे यांची कन्या माझ्या घरातील माझे आजोबा व माझे वडील हे अत्यंत धाडशी व दोघांना सुद्धा समाजकार्याची नितांत आवड त्यामुळे पूर्वीपासून लोकांसाठी काहीतरी करुन दाखवायची माझी जबरदस्त इच्छा होती व माझी ही इच्छा पूर्ण झाली ती माझे लग्न झाल्यावर.

1972 साली करवीर (कोल्हापूर) नगरीत लग्न होऊन आले. लग्न जमवण्याची सुरुवात ही माझ्या सासरातूनच झाली. लहान दिर व नंदेचे लग्न हे मी स्वतः पुढाकार घेवून ठरवले व तेव्हापासून खऱ्याअर्थाने लग्न जमवण्याच्या कार्याला सुरुवात झाली. "आहो हेमाताई मुलगा लग्नाचा आहे त्याला देखणी व अनुरुप मुलगी बघा हो किंवा माझी मुलगी लग्नाची आहे तीला सुस्थापीत मुलगा बघून द्या हो'' या पालकांच्या आग्रहास्तव मी ही स्थळे सुचवत गेले व त्यातूनच लग्न जमत गेली. त्यामुळे हळूहळू याची चर्चा शहरात व आजुबाजूच्या गावात पसरत गेली.

हल्लीच्या काळात लग्न जमवणे ही फारच कठीण गोष्ट बनली आहे याचे मुख्य कारण म्हणजे लोकांच्यात प्रचलीत असलेल्या चुकीच्या कल्पना आत्ताच्या वैज्ञानिक युगात लोकांमध्ये (पालकांमध्ये) अनेक वेड्या कल्पना रुढ आहेत. उदा: मंगळ, कुंडली जमणे, राशी, कुळी इ. यामुळे पालक हाताशी आलेले चांगले स्थळ सोडून देतात.

तसेच सध्याच्या युगात मुले व मुली फारच शिकल्यामुळे स्वाभाविकच त्यांच्या आपल्या जोडीदारा बददलच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. यासाठीच पालकांना व मुलामुलींना योग्य मार्गदर्शन करण्याच्या हेतूने मी प्रत्येक महिन्यातून वेगवेगळ्या शहरात वधू -वर परिचय मेळाव्यांच्या माध्यमातून माझे विचार लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत असते.

आता तर 20 वर्षानंतर हा व्याप फारच मोठा झाला आहे ही गोष्ट सांगताना मला तितकाच आनंद व अभिमान वाटतो सध्या माझ्याकडे मुला-मुलींची हजारांवर स्थळे आहेत यामध्ये परदेशातील व उच्चशिक्षीत स्थळे सुद्धा आहेत. तसेच माझ्या अद्यावत वेबसाईटमुळे स्थळांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहेत.

आमची वेबसाईट www.MarathaVivah.com ही आपणास कशी वाटली हे आम्हाला जरुर कळवावे व त्यात काही सुधारणा करणे जरुरी असल्यास त्या आम्हास आवश्यक कळवाव्यात आपल्या सुचनांचे कायमच स्वागत केले जाईल.
धन्यवाद !

- सौ. हेमा भोसले
संचालिका


वेबसाईट बद्दल...

देशातील व परदेशातील आमच्या असंख्य सभासदांच्या मागणीवरुन आम्ही आमची खास वेबसाईट www.MarathaVivah.com सुरु केली आहे. यावरून आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून आमच्या सभासदांच्या स्थळांची माहिती घेऊ शकता. तसेच आपण आपले नाव आमच्या वेबसाईटमार्फत नोंदवू शकता. यामुळे आपणास दरवेळी स्थळांच्या माहितीसाठी करावा लागणारा खर्च व वेळ नक्कीच वाचू शकेल. या वेबसाईटवर आमच्या सभासदांची नांवे व शिक्षण फोटोसहीत उपलब्ध असतात. ज्यामुळे आपणास स्थळांची प्राथमिक कल्पना घरबसल्या मिळू शकते.

आपणास जर आपली माहिती आमच्या वेबसाईटवर नोंदवायची असेल तर आपणास वेबसाईट चार्जेस भरून नाव नोंदवावे लागेल. नाव नोंदवल्यानंतर स्थळांची प्राथमिक माहिती व फोटो आमच्या वेबसाईटवर ठेवली जाते. व आपल्या स्थळांचा नोंदणी क्रमांक आमच्या केंद्रामार्फत दिला जातो. हा नोंदणी क्रमांक फारच महत्वाचा असतो. कारण केंद्राचे सर्व कामकाज हे सभासदांच्या नोंदणी क्रमांकावरून चालते. आमच्या वेबसाईटवर स्थळांचे पत्ते व फोन नंबर नसतात. जर संपूर्ण पत्ते व फोन नंबर हवे असतील तर ही माहिती आपण कम्युनिकेशन चार्जेस भरून घरबसल्या मिळवू शकता. कम्युनिकेशन चार्जेस न भरल्यास ही माहिती ही आपण स्वतः येवून आमच्या नजीकच्या केंद्रातून मिळवू शकता. जर आपणास स्थळा संदर्भात कोणतीही प्राथमिक माहिती हवी असल्यास कृपया आमच्या कार्यालयीन वेळात (स. 10-00 ते 2, 3 ते 8) फोन करुन मिळवू शकता. तसेच आमची वेबसाईट पाहून ती आपणास कशी वाटली व तिच्यात काही सुधारणा करणे आवश्यक वाटल्यास ते आम्हांस कळवावे.

 


2008-2013 © MarathaVivah.Com. All rights reserved.
Website Designed and Developed by Ajinkya Patil